Joshua 23

1मग परमेश्वराने इस्राएलांस त्यांच्या आसपासच्या सर्व शत्रूपासून विसावा दिल्यावर बरच काल गेला व यहोशवा वयाने वृध्द झाला. 2तेव्हा यहोशवाने सर्व इस्राएल, त्यांचे वडील व त्यांचे मुख्य पुरुष व त्यांचे न्यायाधीश व त्यावरले कारभारी यांस बोलावून सांगितले, मी वयोवृध्द झालो आहे. 3आणि तुमचा देव परमेश्वर याने या सर्व राष्ट्रांस तुमच्यापुढून घालवून त्यास जे केले, ते अवघे तुम्ही पाहिले, कारण की तुमचा देव परमेश्वर याने स्वत: तुमच्यासाठी लढाई केली आहे.

4पाहा, या उरलेल्या राष्ट्रांचा आणि जी राष्ट्र मी मारून टाकली त्याचा सर्व देश यार्देनेपासून पश्चिमेकडल्या मोठया समुद्रापर्यंतही मी तुम्हास तुमच्या वंशाप्रमाणे वतनासाठी वाटून दिला आहे. 5अाणि तुमचा देव परमेश्वर स्वत: त्यास तुमच्यापुढून घालवील, आणि त्यास तुमच्यापुढून वतनांतून काढीलच, आणि जसे तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास सांगितले, तसे तुम्ही त्यांचा देश वतन करून घ्याल.

6फार मजबूत व्हा, यास्तव मोशेच्या नियमशास्राच्या ग्रंथात जे लिहिलेले त्या सर्वांचे पालन करा आणि त्यांपासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नका. 7तुमच्याजवळ जी राष्ट्रे उरलेली, त्यांमध्ये तुम्ही जाऊ नका, आणि त्यांच्या देवाच्या नांवाची आठवण करू नका, आणि त्यांची शपथ घालू नका; त्यांची सेवाहि करू नका, आणि त्यांच्या पाया पडू नका. 8परंतु आजपर्यंत जसे तुम्ही करीत आला, तसे आपला देव परमेश्वर याला चिकटून राहा.

9कारण की, परमेश्वराने तुमच्यापुढून मोठी व पराक्रमी राष्ट्रे वतनातून घालवली, परंतु तुमची अशी गोष्ट आहे की तुमच्यापुढे आजपर्यंत कोणीही माणूस उभा राहू शकला नाही. 10तुमच्यातला एक माणूस हजारांची पाठ पुरवील, कारण की तुमचा देव परमेश्वर याने जसे तुम्हास सांगितले, तसा तो स्वत: तुमच्यासाठी लढतो. 11तर तुम्ही आपला देव परमेश्वर यावर प्रीती करण्यासाठी आपल्या चित्ताची फार खबरदारी घ्या.

12पण जर तुम्ही कोणत्याही प्रकारे मागे वळाल, आणि जी तुमच्याजवळ उरलेली राष्ट्रे यांशी चिकटून राहाल आणि त्यांच्याशी विवाह करून त्यांच्यामध्ये जाल, आणि ते तुमच्यामध्ये येतील; 13तर तुम्ही हे पक्के समजा की यापुढे तुमचा देव परमेश्वर या राष्ट्रांस तुमच्या नजरेपुढून आणखी घालवणार नाही; आणि जी ही उत्तम भूमी तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास दिली, तिजवरून तुंम्ही नाश पावून जाल तोंपर्यंत ती तुम्हास सांपळा व पाश व तुमच्या पाठीला चाबूक व तुमच्या डोळ्यांत काटे असे होतील.

14तर पाहा, आज मी सर्व जग जाते त्या वाटेने जात आहे; परंतु तुंम्ही आपल्या संपूर्ण मनात व आपल्या संपूर्ण चित्तात जाणता की ज्या चांगल्या गोष्टी तुमचा देव परमेश्वराने तुमच्याविषयी सांगितल्या, त्या सर्वातली एकही गोष्ट कमी पडली नाही; अवघ्या तुम्हास प्राप्त झाल्या; त्यांतली एकही गोष्ट कमी पडली नाही. 15तर अस होईल की तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास सांगितलेली जी प्रत्येक चांगली गोष्ट, ती जशी तुम्हास प्राप्त झाली तशी देव तुम्हास प्रत्येक वाईट गोष्ट प्राप्त व्हावी अशी करील; जी ही उत्तम भूमी तुमचा देवाने तुम्हास दिली आहे, तिजवरून तो तुमचा नाश करून तुम्हास घालवी तोपर्यत तो असे करील.

तुमचा देव परमेश्वर याने जो करार पाळण्याची तुम्हास आज्ञा केली आहे, ती मोडून दुसऱ्या देवाची सेवा कराल, आणि त्यांना नमन कराल, तर देवाचा राग तुम्हांवर भडकेल, आणि जो उत्तम देश त्याने तुम्हास दिला आहे, त्यातून तुम्हास त्वरीत नष्ट करेल.

16

Copyright information for MarULB